डाॅ.ए.पी.कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ दिवस – ☆ डाॅ.ए.पी.कुलकर्णी ☆
☆
सप्तवारूंचा रथ घेवुनी
आला पहा नारायण
उजळल्या दाही दिशा
फुलू लागले अंगण.!!
*
थोडे वटारले डोळे
फेकू लागले आग
सुरू जाहलीआता
सर्व जीवांची तगमग !!
*
उन्ह तावून निवाली
थोडी शिरवळ आली
गार वा-याची झुळूक
तन-मना सुखावून गेली !!
*
लांबलांब टाकित ढांगा
धावू लागल्या सावल्या
दमून भागून बिचाऱ्या
पूर्वेकडे विसावल्या !!
*
निळ्या सोनेरी रंगाने
गेले भरून आभाळ
थोड्या वेळातच आता
होईल सायंकाळ !!
*
दिलं येण्याच वचन
पांघरले काळोखाला
दिशा घेऊन उशाला
सूर्यदेव कलंडला
☆
© डाॅ. ए. पी. कुलकर्णी
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈