कविराज विजय यशवंत सातपुते
स्व बाळशास्त्री जांभेकर जयन्ती निमित्त
(जन्म – 6 जानेवारी 1812 – मृत्यु – 18 मे 1846)
☆ विजय साहित्य ☆ आद्य पत्रकार ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
बाळशास्त्री जांभेकर
आद्य पत्रकार थोर
वृत्तपत्र दर्पणाने
जगी धरलासे जोर……!
सहा जानेवारी रोजी
वृत्तपत्र प्रकाशीत
शोभे पत्रकार दिन
ख्याती राहे अबाधीत…..!
शास्त्र आणि गणितात
प्राप्त केले उच्च ज्ञान
भाषा अकरा शिकोनी
केले बहू ज्ञानदान…..!
छंद शास्त्र , नीतीशास्त्र
व्याकरण, इतिहास
पाठ्य पुस्तके लिहोनी
ज्ञानमयी दिला ध्यास….!
पुरोगामी विचारांनी
केले देश संघटन
विज्ञानाचे अलंकार
अंधश्रद्धा उच्चाटन….!
स्थापियले ग्रंथालय
ज्ञानेश्वरी मुद्रांकीत
शोध निबंध जनक
नितीकथा शब्दांकित …!
दिले ज्ञान वैज्ञानिक
केले कार्य सामाजिक
पुनर्विवाहाचे ध्येय
ज्ञानदान अलौकिक….!
भाषा आणि विज्ञानाचा
केला प्रचार प्रसार
दिली समाजाला दिशा
तत्वनिष्ठ अंगीकार…..!
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खूप सुंदर