सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ दोन वेण्या… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

खांद्यावर रुळणार्‍या दोन वेण्या,

जराशा वेड्या, जराशा शहाण्या.

*

हिलती डुलती चाल धरतात,

अल्लड वयाची साक्ष देतात.

जितक्या बालिश, तितक्याच अल्लड,

उडत्या चालीची धरतात पक्कड.

कधी आकाशाला होती ठेंगण्या,

खांद्यावर रूळणाऱ्या दोन वेण्या,

जराशा वेड्या, जराशा शहाण्या.

*

झुलतात वार्‍याच्या झोतावरती,

अडीत उंबरठ्याच्या जरा थबकती.

केसाच्या बटीत  वळून फेऱ्या,

घाबरल्या नजरेत सावध खऱ्या.

हसर्‍या, बोलक्या जरा लाजर्‍या,

खांद्यावर रूळणाऱ्या दोन वेण्या.

जराशा वेड्या, जराशा शहाण्या.

*

रूबाब त्यांचा पहा आगळा!

रिबिनीत गुंतला साज वेगळा.

किती! किती! घट्ट आवळल्या,

वाढत्या वयाचे भान रहाण्या.

खांद्यावर रूळणाऱ्या दोन वेण्या,

जराशा वेड्या, जराशा शहाण्या.

*

दिसतात ऐटदार, चालीत कोवळ्या,

अल्लड वाटेवर,  मनात भोळ्या.

वसा संस्कृतीचा गुंफत आल्या,

खांद्यावर रूळणाऱ्या दोन वेण्या.

जराशा वेड्या, जराशा शहाण्या.

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments