श्री दयानंद घोटकर
कवितेचा उत्सव
☆ दोहे… ☆ श्री दयानंद घोटकर☆
(दोहे (प्रेरणा कबीर))
☆
अडीच अक्षरी प्रेम शब्द
यात जीवनाचे सार आहे
पोथी, पूजा, कर्मकांडे सारी
हे सारे व्यर्थ आहे…
*
मुखी भाषा हवी,स्वच्छ
फक्त निर्मळ प्रेमाची
प्राण्यांनाही कळते भाषा
प्रेमळ स्पर्शाची…
*
सततच्या नामस्मरणात
दंग राहिल्याने काय होते
सुख दुःखा पलिकडचे
समाधान ते मिळते…
*
तिळ,मोहरी,शेंगदाणे
यामधे तेल असते
प्रत्येकाच्या हृदयात
तसेच प्रेम असते…
*
मन शांत असेल
हृदय क्षमाशील असेल
तर शत्रुच उरणार नाही
तो ही तुमच्यावर प्रेम करेल..
*
प्रेम करणे म्हणजे
भक्ती करण्यासारखेच आहे
मन आणि ध्यान,चिंतन
दोन्हीकडे आहे…
*
मंदिरात न जाताही
पूजा करता येते
गुरुकृपा होताच
जीवन धन्य होते…
*
हवा, पाणी ऊन
सारे असले तरी
ऋतु बदलल्यावरच
फुले, फळे येतात खरी….
*
कावळा आवडत नाही
पण कोकीळ आवडतो
हा आवाजाचा,परिणाम
नम्र माणूस सर्वांनाच हवासा
वाटतो….
*
श्रद्धा, पूजा-अर्चा ठिक आहे
जो मी पणाचा त्याग करुन
गुरुला शरण जातो
तोच खरा भक्त होऊ शकतो..
☆
© श्री दयानंद घोटकर
संपर्क – तावरे काॅलनी.सातारा रोड.पुणे
मो 9822207068
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈