श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ येरे येरे पावसा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
☆
आता बरस रे घना, झाली धरा कासावीस
हवे कशाला ते तुला, खोट्या पैशाचे अमिष?
*
साऱ्या जीव सजिवांचे, पाणी तोंडचे पळाले
डोळा दाटले पाणीही, गालावरीच सुकले
*
पहा हताशली झाडे, सुरु जाहले क्रंदन
पानाफुलांचे वैभव, दिले धरेला आंदण
*
ग्रीष्म जागचा हलेना, जसा नाठाळ पाहूणा
उरी पेटले आभाळ, कशी येईना करुणा.
☆
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈