प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ विडंबन काव्य… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

(तुझ्या गळा माझ्या गळा कवितेचं विडंबन- कै. राजकवी भा .रा .तांबे बडोदा यांची क्षमा मागुन )

पायात कळा

डोक्यात कळा

पोटात फिरतोय

वायगोळा !!

      ।। ध्रु ।।

 

तुझी कळ

माझी कळ

कुठला भोगतो

हा छळ

कुठून येणार हे बळ

मलाच तुझा कळवळा !! ।। 1 ।।

 

तुझ्या कळा माझ्या कळा

दाखवू दोघेही डॉक्टरला

 

तुला औषध

मला गोळी

आणखी इंजेक्शन कुणाला ?

वेड लागले डॉक्टरला

आपल्याला नव्हे नर्सला !! ।। 2 ।।

 

तुझी काठी

माझी काठी

फिरू दोघे नदीकाठी

सरकली गुढघ्याची वाटी

नकोच आता अटी तटी !!

(म्हातारपण हे कश्यासाठी)

हात पाय कापतात

चळाचळा ।। 3 ।।

 

तुझ्या गळा माझ्या गळा

कळा येतात वेळोवेळां

 

तुझे पित्त

माझा संधिवात

आणखी खोकला कुणाला ?

भुर्दंड नुसता खिशाला

गावठी उपाय परवडला 🤠 ।। 4 ।।

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments