श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ सागरा ! प्राण तळमळला... ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
वीरदेहाची गाथा
देशभक्तीचा माथा
काराभिंतीला चिंता
जळलाटांना कव //
महाधैर्याचे ध्येय
भारतपुत्रा श्रेय
हिंदवीबल जय
दुष्टशत्रुंना भय//
युगेअमर क्रांती
सुर्यचंद्रमा कांती
ऐतिहासीक माती
स्वातंत्र्याचा राजा //
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈