सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ गोपीकृष्ण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
*गोपीकृष्ण
नदीच्या काठावर,
झऱ्याच्या पाण्यात ,
निळाई अंगावर,
पांघरून संगत ….१
*
मनाला भुरळ,
घाली तो सतत!
देतोस तू जणू,
कृष्णसख्या साथ!….२
*
झाडांची सावली,
पाण्यात हिरवाई,
जळाच्या आरशात,
मोरपिसे कृष्णाई!…३
*
गोपी येती साथीला,
दंग झाल्या लीलेत,
कृष्णाच्या संगतीत,
धुंद होऊन नाचत!….४
*
रास रंगे गोकुळी ,
गोकुळ होई सुखी!
नवनीत देती गोपी,
कृष्णाच्या गोड मुखी.!…५
*
येई सांज सकाळ,
घेऊन रंग सोनेरी,
आनंद देई मला,
कृष्णाची बासरी!….६
☆
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈