डॉ.सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☆ माझा कुणी नाही.. ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
☆
तो माझा आहे तरी
माझा कुणी नाही..!
*
सावली हवी तेव्हा
झाड होऊन येई
विरहाच्या भावनी
पाऊस सरी बरसी
*
एकांताच्या क्षणी
कविता दाटे मनी
गाणे होऊन भेटे
वादळ वाटेवरी
*
प्रकाश जेव्हा लागे
सूर्य तो सकाळी
दिप होऊन भेटे
अंधारल्या वेळी
*
तो माझा आहे तरी
माझा कुणी नाही..!
☆
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈