सौ. वृंदा गंभीर
कवितेचा उत्सव
☆ कविता – चाळिशीच्या वळणावर ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
☆
चाळिशीच्या वळणावर
एकांत हवा
मन तरुण राहण्यासाठी
एक मित्र हवा
मोकळं जीवन जगावं
बिनधास्त राहावं
यासाठी एक खोडकर
मित्र हवा
संसाराच्या रहाडगाडग्यात
दमून गेलं तरी
मन फुलून जायला
एक मित्र हवा
डोळ्यातील आसवं पुसायला
मी आहे ना हक्काने सांगायला
एक मित्र हवा
सुख दुःखात साथ द्यायला
हाकेला धावून येणारा
एक प्रेमळ मित्र हवा
मनातील ओळखणारा
चेहऱ्यावरील भाव टिपणारा
एक भावुक मित्र हवा
मन हळवं असणारा
माझी वेदना बघून
घायाळ होणारा एक मित्र हवा
माझ्या चेहऱ्यावर दुःखात ही
हसू आणणारा
एक हसतमुख मित्र हवा
– दत्तकन्या
☆
© सौ. वृंदा गंभीर
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈