☆ कवितेचा उत्सव : राधा कृष्ण…. ☆ सौ.मनिषा रायजादे पाटील ☆
एकरूप
दोन जीव
जणू भासे
उमा शिव
कृष्ण राधा
नित्य ध्यास
दोन देह
एक श्वास
अवतरे
जगी प्रीत
समर्पण
हीच रीत
प्रेमांकुर
मनी फुले
राधा वेडी
स्वप्नी झुले
हा दुरावा
प्रीती जरी
दृढ नाती
जन्मांतरी
© सौ. मनीषा रायजादे-पाटील
सांगली
9503334279
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
आपल्या साहित्य चे स्वागत आहे .