☆ कवितेचा उत्सव ☆ कोरोना ☆ श्री शरद कुलकर्णी☆ 

क्वारंटाइन व्हावे,

सांगावे नलगेचि.

आता अंतराची,

जाण ठेवा.

 

जाण ठेवा तुम्ही,

ओळखा रे नाती.

होणार ती माती,

अनिर्वाय.

 

अनिर्वाय जगणे,

जोवरी हा श्वास.

तरीही हव्यास,

हकनाक .

 

हकनाक आहे,

कोरोनाचे भय.

नाशिवंत देह,

हेच सत्य.

 

कधी सव्य आणि

कधी अपसव्यं .

अर्पणतर्पण,

समजावे.

 

©  श्री शरद कुलकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments