मेहबूब जमादार
कवितेचा उत्सव
☆ हळुवार पाऊस… ☆ मेहबूब जमादार ☆
☆
हळुवार आला पाऊस
थोडं हातंच राखून
चौखुर उधळी खोंड
वास मातीचा पिऊन
*
शहारली झाड वेली
हेलावत गेलं पान
गरजत शिरे वारा
झाडांची मोडली मान
*
दूर डोंगरानी कसे
होते आभाळ धरून
आली पाऊस धारा
गेली दुधाळ होऊन
*
झाली माती ओलीशार
येती कोंब फाकून
सखे चल जाऊ रानी
घेऊ थोडंसं भिजून…
☆
© मेहबूब जमादार
मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈