श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ कविता… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

लेऊन शब्द सुमने सजते मनात कविता

 होऊन लाडकी मग रमते जनात कविता

*

रंगात रंगताना असली आनंद देते

प्रत्येक माणसाच्या वसते मुखात कविता

*

फुलपाखरी मनाची आहे आनंद वेडी

वारा बनून जाते हिरव्या पिकात कविता

*

सुखदुःख भोवतीचे पदरात तीच घेते

घेऊन वास्तवाला फिरते जगात कविता

*

प्रेमात प्रेमिकांच्या न्हाऊन धुंद होते

तारूण्य भोगताना येते भरात कविता

*

चपला नभातलीही वसते मनात माझ्या

झालीच देव आहे माझ्या घरात कविता

*

जातीत आपला का झुलतो समाज आहे

माणूसकी जपाया झटते नितांत कविता

*

आहेत आंधळे जे झाले गुलाम येथे

भरवील आज त्यांच्या धडकी उरात कविता

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments