सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

🙏 नरशार्दूल  🙏 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

🏆 जागतिक साकव्य विकास मंचच्या काव्यलेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त 🏆

भारतभूच्या स्वातंत्र्याची मशाल धगधगती

विनायकाची जाज्वल्य अशी थोर देशभक्ती || ध्रु ||

*

मातृभुमीची मुक्तता हाच ध्यास मनी होता

शिक्षणातुनी ध्येयासाठी अढळ यत्न होता

तारूण्यातच स्वदेशावरी करी पतंगप्रिती

विनायकाची जाज्वल्य अशी थोर देशभक्ती ||१||

*

स्वतंत्रतेचे स्तोत्र रचूनी केली नित्य पुजा

उध्दरणास्तव तिच्या भोगिली अपरंपार सजा

अपार ध्येयासक्त मनाची दृढ श्रद्धा होती

विनायकाची जाज्वल्य अशी थोर देशभक्ती ||२||

*

क्रांतीसाठी प्रेरक बनुनी मुक्त राहण्याला

बंदीवासा चूकविण्यास्तव बेत नवा केला

मार्सेलिसला झेप सागरी जणू प्राणाहुती

विनायकाची जाज्वल्य अशी थोर देशभक्ती ||३||

*

क्रांतीकारक उडी शुराची त्रिखंडात गाजे

स्वातंत्र्याची रणदुंदूभी उच्चरवे वाजे

शंभरवर्षे तळपे नरशार्दूलाची महती

विनायकाची जाज्वल्य अशी थोर देशभक्ती ||४||

*

भारतभूच्या स्वातंत्र्याची मशाल धगधगती

विनायकाची जाज्वल्य अशी थोर देशभक्ती ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments