कवी राज शास्त्री
☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 33 ☆
☆ आजचा युवक… ☆
आजचा युवक कसा असावा ?
याचा जेव्हा प्रश्न पडावा
विवेकानंदाचा तेव्हा
आदर्श सर्वांनी घ्यावा…१
काय त्यांचे तेज
कसे त्यांचे विचार
त्यांच्या विचाराचे
आपण करावे सुविचार…२
आजचा युवक
व्यसनाधीन झाला
आजचा युवक
कर्जबाजारी बनला…३
आजचा युवक
लाचार आणि बेकार
आजच्या युवक
दारू खर्रा खाण्यात हुशार…४
आजचा युवक
गुंडगिरी करतो
आजचा युवक
आईला छळतो…५
आजच्या युवकाने
खूप बेकार कृत्य केले
जन्मदात्या आई-बापाला
वृद्धाश्रमात पहा डांबले…७
माणुसकी लोप पावली
काळिमा नात्यास लागली
आपल्याच हाताने युवकाने
नात्याची राखरांगोळी केली…८
सख्खी बहीण याला भिते
वासनांध हा झाला
वासनेच्या भरात याने
ऍसिडचा हल्ला केला…९
सात्विक आपला भारत
आपण त्याचे रहिवासी
कसे आपण राहावे
न कळत बनला वनवासी…१०
हे सर्व थांबले पाहिजे
युवक जागृती महत्वाची
माणूस म्हणून युवकाला
भाषा कळावी आपुलकीची…११
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈