महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 181
☆ पहिला पाऊस… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆
☆
पहिला पावसाळा, सुचते कविता कुणाला
पहिला पावसाळा, चिंता पडते कुणाला.!!
*
पहिला पावसाळा, गळणारे छत आठवते
पहिला पावसाळा, राहते घर प्रश्न विचारते.!!
*
पहिला पावसाळा, शेतकरी लागतो कामाला
पहिला पावसाळा, चातकाचा आवाज घुमला.!!
*
पहिला पावसाळा, नदी नाले सज्ज वाहण्या
पहिला पावसाळा, झरे आसूसले कूप भरण्या.!!
*
पाहिला पावसाळा, थंड होय धरा संपूर्ण
पहिला पावसाळा, इच्छा होवोत सर्व पूर्ण.!!
*
पहिला पावसाळा, शालू हिरवा प्राची पांघरेल
पहिला पावसाळा, चहू बाजू निसर्ग बहरेल.!!
*
पहिला पावसाळा, छत्री भिजेल अमर्याद भोळी
पहिला पावसाळा, पिकेल शिवार तरच पोळी.!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈