सुश्री मानसी विजय चिटणीस
कवितेचा उत्सव
☆ “आषाढ…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस ☆
ओथंब ओथंब
मन जणू कदंब
देहरुपी राधेला
खुलवितो श्रीरंग…
ओसंड ओसंड
भावनांचा बांध
नयनांच्या कोंदणी
वसतो श्रीरंग..
गंधार गंधार
श्वासांचे फुलार
अंतरंगी पेरतो
मल्हार श्रीरंग…
बहर बहर
उमलते पोर
पाऊस धारेत
आषाढ श्रीरंग…
© सुश्री मानसी विजय चिटणीस
केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈