सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ काव्यपंढरी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

जमे शब्दांचा मेळावा

वाजे कल्पना मृदुंग

टाळ विचार वाजती

अोठी येतसे अभंग ॥

*

आत्मा संताच्या प्रस्थाना

पालखी ही सजविली

अलंकार उपमांची

फुगड्या रिंगणे झाली ॥

*

कागदाच्या हो पताका

विणारूपी ही लेखणी

अक्षर तुळस उभी

शाईच्या त्या वृंदावनी ॥

*

मन झाले पांडूरंग

मी विठूचे अंतरंग

बरसतो कृपाघन

इंद्रायणी देई संग ॥

*

आशय विठ्ठल माझा

प्रसन्नला पहा हरी

टाळ चिपळ्या गजरी

नाहली काव्य पंढरी ॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments