सौ. मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ पंढरीची वारी… ☆ 🖋 सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆

(अभंग रचना – आषाढ महिमा)

पंढरीची वारी|पावन सोहळा||

विठोबा सावळा|कनवाळू||१||

*

आषाढ महिमा|संत संगतीचा||

पुण्य पर्वणीचा| सज्जन हो||

*

आनंदी स्पंदन|   निर्मळ भक्तीने||

अद्वैत शक्तीने| भारलेले||

*

मुखी हरी नाम| गोडी अमृताची||

जीवाला सुखाची|| गवसणी||

*

भावाचा भुकेला|संवाद साधतो||

कौतुक पाहतो|पांडुरंग ||

*

भक्त संगतीत| गुंतवून मन||

रमा नारायण| वाट पाही||

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

सांगली.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments