श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ आषाढीची वारी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

नको काशी मथुरा वृंदावन दूर

चंद्र भागेतटी आहे माझे पंढरपूर

*

ज्ञानीयाचा राजा आळंदीचे ठाई

घेऊ या दर्शन नका करू घाई

पालखी सोहळा वैष्णवांचा मेळा

भक्ती संगम हा

 भरून पाहू डोळा

*

लाख टाळ जमला पालख्या अपार

चंद्र भागेतटी आहे माझे पंढरपूर

*

आषाढाचे घन भरून येई मन

पंढरीच्या वाटे वारकरी जन

टाळमृदुंगाचा होतसे गजर

विठू दर्शनाशी भक्त हे आतुर

आठवता पांडुरंग तुटते  अंतर

चंद्रभागे तटी आहे माझे पंढरपूर

*

संसाराची व्यथा टोचते सर्वथा

 हरिनाम घेता नुरे काही चिंता

नासले आयुष्य सुख शोधू जाता

नको मोहमाया विठू एक भ्राता

*

विश्वासून त्याचेवर सोडीयेले घर

चंद्र भागेतटी आहे माझे पंढरपूर

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments