श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 182 – आयुष्य ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
(मोठा अभंग)
☆
धिराने हाकावी।
आयुष्याची गाडी।
सुख दुःख जोडी।
जुंपोनिया॥1॥
*
सुखाचे सोबती।
सारे जन परी।
समबुद्धी धरी।
चित्ती तुझ्या॥2॥
*
धैर्याने चढावे।
दुःखांचे डोंगर।
सुखाचा सागर।
दिसे तया ॥3॥
*
कानमंत्र ठेवी।
अविरत ध्यानी।
वृत्ती समाधानी।
सदोदित॥4॥
*
आवरी मनाला ।
भारी अवखळ।
जगी मृगजळ।
ठायी ठायी॥5॥
*
ओंडके वाहण्या।
नको मोठेपण।
मुंगीचाच प्रण।
साखरेचा॥6॥
*
अविवेकी संग।
होई वाताहत।
मर्कटाची गत।
आयुष्याची॥7॥
*
हक्क कर्तव्याचा।
जमविता मेळा।
आनंद सोहळा।
आयुष्याचा॥8॥
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈