☆ कवितेचा उत्सव : शब्द – झरे….. ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे ☆
शुभ्र , फेनल शब्द झर्यानी ,
बहरुन आले काव्याचे,डोंगर !
नवकाव्याची हिरवी रोपे,
उमलून आली त्या अंकावर !
मनोभावना शब्द कवीच्या,
अविरत झरती सृष्टी पटावर !
त्या शब्दांनी खुलूनी आले,
शब्द सृष्टी चे,असीम अंबर !
सोनसळ्या किरणातून झरती,
श्रावण धारा मनकुंभातुनी !
वैभव सारे साहित्य गिरीचे,
उजळुन येई शब्दामधुनी!
उधाण येईल प्रेमसागरी,
शब्द सरिता मिळताच जळी !
शब्द झर्यातील बिंदू न् बिंदू,
बनतील मोती सागर तळी !
© सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे
मो.नं . 8087974168
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
शब्दझरे असेच वाहत राहोत.