सौ. रेखा दयानंद हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ – विडंबन गीत… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆
(चाल – लटपट लटपट तूझं चालणं)
चमचम चमचम चमचम चमचम
तुझं चमकणं साऱ्यांच्या नजरेत
नेसणं तुला अंमळ कष्टांचं
साडी ग…साडी ग..ग साडी ग..ग साडी ग…
*
विविधता नवनवतीची, कितीक रंगाची नव्या ढंगाची
ह्रदयाच्या तू जवळी
दिसे नार तुझ्यामुळे चवळीची शेंग कवळी
तूला नेसून ती मिरवी
असे नार तूझ्यासाठी पहा किती हळवी
बाईपण ती जपते ने मिरवते तोऱ्यात
आवडे कौतुक स्वतःचं
फिटे मग पारणं डोळ्यांचं
साडी ग…साडी ग..ग साडी ग..ग साडी ग…
*
नऊवारी चा डौल, शालू अनमोल, पटोला पहा ना
कशिद्यावरती राघू मैना
कितीही असल्या तरी मन काही भरेना
साडीचं दुकान सोडवेना
बिलाचा आकडा बघून नवऱ्याची होई दैना
असा हा महिमा साडीचा
साडीवरचं प्रेम असं आम्हा बायकांचं
पुढेही चालतंच रहायचं
तिच्या पुढे चालेना ड्रेसचं
साडी ग…साडी ग..ग साडी ग..ग साडी ग…..
*
🥰दEurek(h)a 😍
🥰दयुरेखा😍
© सौ. रेखा दयानंद हिरेमठ
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈