म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? कवितेचा उत्सव ?

☆ गावचा निरोप काही येईना… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

   गावचा निरोप काही येईना, गावची आठवण काही जाईना 

   हात मायेचे लई भेटले, पदर मायेचा काही भेटेना 

   *

   फायदा अडचणीचा घ्यायला, पुढे आले मदत द्यायला 

   हात ओढणारे लई भेटले, साथ देणारा काही भेटेना 

   *

   संगे बसती तासन तास, बोल बोलती गोड खास 

   टीका करणारे लई भेटले, चुका सांगणारा काही भेटेना 

   *

   यादी पदार्थांची साठ, त्यात इथले पदार्थ आठ

   तूप रोटी लई भेटली, शिळी भाकर काही भेटेना 

   *

   वाढदिवसाला मेजवानी, आले सहकारी ढिगानी 

   गळा येऊन लई भेटले, गळ्यात पडणारे काही भेटेना 

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments