श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ आज तिरंगा…🇮🇳 ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

भारतियांच्या नभांगणावर उंच फडकतो आज तिरंगा

मी तेजाचे प्रतीक आहे हेच सांगतो आज तिरंगा

*

समता ममता प्रेम जिव्हाळा एक दिलाने इथे नांदतो

लोकमतांच्या स्वातंत्र्याचा मान राखतो आज तिरंगा

*

भविष्य उज्ज्वल घडवायाला नव्या योजना अंगिकारतो

क्षितीजावरती आकांक्षांचे गाव कोरतो आज तिरंगा

*

सरस्वतीची बांधून पुजा अभिमानाने ज्ञान मिळवतो

खडतर वाटा ओलांडत मग खूप राबतो आज तिरंगा

*

इतिहासाच्या परंपरांचे वैभव आहे त्याच्या संगे

संस्कारांचा अगणीत ठेवा स्वयें राखतो‌ आज तिरंगा

*

मनासारखे घडवायाचे तर मग राखा बळ ऐक्यचे

भारतियाना आग्रहपूर्वक हेच बोलतो आज तिरंगा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments