श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वप्न… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

कधीतरी कुठेतरी 

चंद्र येईल भेटीला 

छोटे लागेलही गाव 

पायतळीच्या वाटेला 

*

निष्पर्णल्या फांद्यांवरी 

चैत्र पालवी फुटेल 

सर मौनाकाशातून 

सार्थ शब्दांची येईल 

*

ऊन अडवून मेघ 

थोडी धरेल सावली 

काट्याकुट्यांची जी वाट 

होईलही मखमली 

*

याच स्वप्नांनी स्वप्नात 

रोज जाणे हरवून 

रणी यायचेच पुन्हा 

खोल जखमां घेऊन…

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments