सुश्री नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ चंद्र… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
बोला म्हणून त्यांना
सांगायचे कशाला !
अव्यक्त मौन आपुले
सोडायचे कशाला !
*
जखमा उरातल्या या
ज्यांनी बहाल केल्या
त्यांच्यासमोर अश्रू
ढाळायचे कशाला !
*
कोंडेल वाफ जोवर
तोवर तशीच ठेऊ
विस्फोट होऊ दे
मग भ्यायचे कशाला !
*
ओटीत चंद्र माझ्या
अन तारका सवेही
हलकेच चांद त्यांना
मी दाखवू कशाला !
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈