प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
कवितेचा उत्सव
☆ श्रावण… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
☆
श्रावण आला तुषार घेऊनी
सोनकोवळे उन्ह घेऊनी
झुला झुलवत इंद्रधनुचा
सप्तरंगाचे क्षितिज घेऊनी
*
यमुना तीरी आला गरजत
राधेची पण छेड काढीत
गुलाबदाणी हाती मोगरा
अत्तरदाणी होता शिंपित
*
श्रावणातील निळमेघ तो
अधरावरी खाली झुकला
धीर सुटला त्या मेघातून
राधेला तो भिजवुनी गेला
*
गंधीत होऊनी आला वारा
जुनी ओळख सांगून गेला
शीर शीर शीळ घालीत
नभपक्षी तो उडून गेला
*
श्रावण आला तुषार घेऊनी
गिरीशिखरांना कवेत घेऊनी
हिरव्या हिरव्या पाना मधुनी
श्रावण मारवा नक्षी गोंदुनी
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈