श्री शुभम अनंत पत्की
☆ कवितेचा उत्सव ☆ लागला मिसळण्या अश्रुधूर ☆ श्री शुभम अनंत पत्की ☆
प्रसन्न वातावरण होते किती,
दिवस हा होता पवित्र किती
लागले गालबोट या नेत्यांमुळे,
पोलिसांचे कोंडले श्वास किती
लोकशाहीचं आदर्श मॉडेल,
स्विकारले होते आज देशाने
प्रजासत्ताक चिरायु होण्याचे,
७२ सोहळे झाले शांततेने
पोलिसांनी तारलं होतं,
कोरोनामध्ये सर्वांना
तुम्ही का चिरडलं आज,
गवत समजून दुर्वांना
करा कितीही सारवासारव,
ऊरात राहिल खदखद सर्वदूर
दिल्लीचे हे असह्य प्रदूषण,
लागला मिसळण्या अश्रुधूर
© श्री शुभम अनंत पत्की
२६/०१/२०२१
(कवितात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈