सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “माझा बाप्पा… घरी येता… ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

बाप्पा रे बाप्पा 

तू घरी असता 

मला नाही चिंता 

कशाचीच आता…

*

तुझ्या माझ्या गप्पा

होतीलच आता

मनातलं सारं

येईल तुला सांगता…

*

तुझ्याकडे आता वेळच वेळ

तुझा माझा छान बसेल मेळ 

घरीच रंगेल प्रत्येक खेळ

सोबतीला गोड गोड प्रसादाची भेळ…

*

तू घरी आल्यावर

कोणीच नाही मला ओरडत

छोट्या छोट्या खोड्यांनी 

कुणाचे काही नाही बिघडत…..

*

घरी सर्वांना गडबड घाई

मला कोणी ओरडत बसत नाही

गोड खाऊ न मागताच हातावर येई

तुझ्यासोबत माझीही चैन मग होई….

*

तुझी माझी जमते गट्टी

मी ही नाही वागत मग हट्टी

अभ्यासाला हळूच घेऊन सुट्टी

शाळेला ही कधीतरी मारतो बुट्टी….

*

म्हणूनच देवा मी तुझी वाट पाहतो

तुझ्या येण्याची छान तयारी करतो

माझा बाप्पा मला हवाच असतो

गणेश चतुर्थीला तो माझ्याच घरी राहतो….

*

वाजत गाजत येतो

हसत खेळत राहतो

मना प्रसन्न ठेवतो

दुःख सारे संपवून टाकतो….

*

सर्वांना बुध्दी छान देतो

आम्ही सगळे त्याचेच ऐकतो

म्हणूनच मोठ्यांच्या ओरड्यापासून 

मी रोज रोज बचावतो….

*

देव बाप्पा देव बाप्पा

मला वाटते आता

तू नेहमीच आमच्या घरी रहावा

मोठ्यांनाही थोडं लहानपण दे गा देवा….

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments