श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “स्वर्गास प्राप्त मी” ☆ श्री आशिष मुळे ☆

स्वर्गास प्राप्त मी

विटली जेव्हा स्वर्ग कथा

विरघळली हवेत व्यथा

दिशाहीन जेव्हा होती दिशा

*

कोठून आलो कुठे चाललो

कुठे होतो कुठे पोहोचलो

फकीर प्रश्न हे निरर्थक

फाट्यावर त्यांना मारत राहिलो

*

स्वर्गास प्राप्त मी

शांतीस प्राप्त गाजावाजा

मतास त्यांच्या माझा मंत्राग्नी

माझ्या गतीचा मीच राजा

*

नको माप कोणाचे

नाही मोजले कधी स्वतःचे

मापातही मारती हात

काय वजन त्या मापाचे

*

स्वर्गास प्राप्त मी

क्रूर चेष्टा कळे निसर्गाची

काळही असे मतीभ्रष्ट

जाण नाही त्यास दिशांची

*

लाखो आले लाखो गेले

लाखो येतील लाखो जातील

धर्म-अधर्म करता करता

सगळेच एकदा माती होतील

*

स्वर्गास प्राप्त मी

मानवांस निरुपयोगी मी

ढुंकूनही बघू नका इकडे

स्पर्धेसाठी नाही उत्सुक मी

*

तुझे खरे की माझे खोटे 

कोण जिंकले कोण हरले

मुकुट सगळे तूच घाल

माझे तर मी श्राद्ध घातले

*

स्वर्गास प्राप्त मी…

नरकाने मज हेच शिकवले..

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments