श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ अखंड फेरे… ☆ श्रीशैल चौगुले ☆
(प्रस्तुत काव्यविषयास सुप्रसिध्द हिंदी कवी ‘अज्ञेय’ (वात्सल्यायन) यांच्या हिंदी रचनेचा आधार.)
☆
झेप पाखरा, घे नभात तू
पवित्र तृणपाती हाती घेऊन
असे घेरुनी टाक नभाशी
जीवन तुझे संकटे पार होऊन.
*
जाग्र झाली सृष्टी उषःप्रभा
तुच सोबती तुझ्या यशाचा
तृणपाती बळ जगण्याचे श्वास
मृदमाता झळक उषेचा.
*
पंखात भविष्य अजिंक्य भरारी
भय कुणाचे कशास मनी
उंच-उंच घे झेप चक्षुंनी दिव्य
अमर होई तव ती बांधणी.
*
दृढ निश्चय कापीत लक्ष व्यूह
उद्या सुखाचे निश्चिंत आयुष्य
व्यापून टाकशील नभ क्षितीजे
विश्वास तुझे तृणपाती सदृश्य.
*
आवाहन पेलणे जन्म सार्थकी
सातत्य भिरभिरणे कर्म तुझे
फळ तृणपाती पवित्र देईल
बघ किरण स्वागता तुला पुजे.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर