महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 191
☆ स्वप्नातलं विश्व… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆
☆
तिला बोलावं वाटतं
तिला पहावं वाटतं
तिला छेडावं वाटतं
स्वप्नात कधीतरी.!!
*
तिला ऐकावं वाटतं
तिला भांडावं वाटतं
तिला स्पर्शावं वाटतं
स्वप्नात कधीतरी.!!
*
तिच्यात गुंतावं वाटतं
तिच्यात असावं वाटतं
तिच्यात गुंगावं वाटतं
स्वप्नात कधीतरी.!!
*
तिला अनुभवावं वाटतं
तिला स्नेह द्यावं वाटतं
तिला हसवावं वाटतं
स्वप्नात कधीतरी.!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈