श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ कवितेतून उगवून आला हात… ☆ डॉ. प्रेरणा उबाळे ☆
☆
चित्र काढा रंग भरा
नाचा-बागडा श्वास घ्या
कवितेतून उगवून आला हात
*
अंकुर फुटवा फुलं फुलवा
सुगंध घ्या रस प्या
कवितेतून उगवून आला हात
*
डोळ्यात साठवा मनात भिजवा
शाईत बुडवा कल्पनेत रमवा
कवितेतून उगवून आला हात
*
कलरव नुसता मंजुळ गाता
पुढे पुढे जाता थांबा न आता
कवितेतून उगवून आला हात
*
नटा सजा पृथ्वी व्हा
उठा लढा आकाश व्हा
कवितेतून उगवून आला हात
*
मुक्त व्हा रममाण व्हा
सारथी व्हा स्वतःचे स्वतः
कवितेतून उगवून आला हात
*
कविता ब्रम्हांड असे स्वानंद
कविता सारंग नवा आरंभ
कवितेतून उगवून आला हात…
☆
© डॉ प्रेरणा उबाळे
सहायक प्राध्यापक, हिंदी विभागाध्यक्षा, मॉडर्न कला, विज्ञान और वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), शिवाजीनगर, पुणे ०५
संपर्क – 7028525378 / [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈