सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ गोंधळ… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
☆
गोंधळ मी घालते तुझा गं अंबाबाई
सत्वर मला पाव गं पूजा करते आई
*
पहिल्या गोंधळाला पूजा सरस्वती आई
विद्येची देवता तू आहे गं मायबाई
साक्षरतेचा संदेश देते सर्वांना मी आई
सत्वर मला पाव गं पूजा करते आई
*
दुसरा गोंधळ केला’ काली’ गं आमची आई
रोड रोमिओंची गुंडागर्दी बाई
अद्दल चांगली घडवू, शक्ति दे मला आई
सत्वर मला पाव गं पूजा करते आई
*
तिसर्या गोंधळाचा दुर्गावतार मीच घेई
सासरच्या छळाला कंटाळले गं बाई
हुंड्यासाठी मला छळतात ठाई ठाई
सत्वर मला पाव गं पूजा करते आई
*
गोंधळ मी घालते तुझा गं अंबाबाई
सत्वर मला पाव गं पूजा करते आई
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈