प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
कवितेचा उत्सव
☆ सोड आता बाण रे… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
☆
पाहिले ना मी चंद्र सूर्य तारे
इतुक्यात राजा झोपलास का रे ? ।। ध्रु ।।
*
सतार अजुनी अबोल आहे
अंगावरी तिच्या खोळं आहे
उघडना गवसणी आत चंद्र तारे ।। 1 ।।
*
लाव षड्ज तो तार सप्तकात
बहरू दे सतार उच्च आरोहात
अबोलीचे बोल जरा ऐक नारे ।। 2 ।।
*
पणतीमध्ये पेटू दे ती वात
भिजू दे सर्वांग तुझ्या प्रेमात
क्षितीवरती सुटू दे गार वारे ।। 3 ।।
*
छेडल्या तारात ठहराव घे रे
गडबड नको अवरोहात कारे
चमकू दे गगनी शुक्र अन तारे ।। 4 ।।
*
दरबारी रागात गुलाबी ढंगात
फुलू दे मोगरा महिरपी कंसात
मदन मंजिरीचा सोड आता बाण रे ।। 5 ।।
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈