श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

 

☆ 👁️ डोळे… 👁️  श्री सुहास सोहोनी ☆

एक सूख आनंदाने

डोळ्यांमधून हसू लागलं

एक काहूर अश्रू होऊन

डोळ्यांमधून वाहू लागलं

*

तृप्तीचा एक भाव

डोळ्यांवाटे मनांत जिरला

मनांवरचा एक घाव

डोळ्यांमधून गळून पडला…

*

राग लोभ द्वेष प्रेम

सारा भाव डोळ्यांत दिसतो

अंतर्बाह्य माणूस दिसे

डोळा एक आरसा असतो…

*

उघडे डोळे झाकले डोळे

विस्मयाने फाकले डोळे

विस्फारलेले ताठ डोळे

घाबरलेले बंद डोळे…

*

शांत डोळे क्लांत डोळे

दर्शन घेण्या उत्सुक डोळे

आतूर डोळे चतूर डोळे

परदु:खाने थिजले डोळे —

*

डोळे नसती कधीच पापी

नजर वाकडी असते

भला बुरा तर माणुस असतो

नाठी बुद्धी चळते —

*

काळ्या काळोखास बघावे

की तेजाने दिपून जावे

भव्य बघावे, दिव्य दिसावे

दृष्टीत सृष्टीला ओढावे —

☘️

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments