श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ जगणं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
“शब्दातून जितकं घ्यायचं
त्याच्याहून अधिक द्यायचं असतं
आपलं बळ वाढवण्यासाठी
धडपडत जगण्यासाठी
आपणच आपल्याशी,
आयुष्याशी प्रामाणिक राहून.
साम्राज्य आपल्यासाठी
नसतं उभारायचं
इतरांनाही त्यात
बरोबरीने वाटा द्यावा लागतो
सुराज्य होण्यासाठी.
हे जेव्हा कळेल माणसाला
तेव्हा कोणालाही लागणार नाही
काही सांगायला
आपलं तुपलं ओळखायला
जबाबदाऱ्या पेलायला
आपापल्या
नाहीतर
पालथ्या घड्यावर पाणी टाकून काय उपयोग.
जेव्हा ते सुलटे होतील
तेव्हाच भरतील.
नाहीतर
आहेच त्यांची उतरंडी रचणं
कोणाच्यातरी आशीर्वादवर जगणं.
अंधारबनातलं.
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈