सौ. वृंदा गंभीर
कवितेचा उत्सव
☆ तुमचं यश तुमच्या हातात… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
☆
एक वेळ असते त्या वेळेत
कोणीच साथ देत नसतं
जवळचेच तोंड फिरून जातात
तेंव्हा कुणीच कुणाचं नसतं
*
एक वेळ पुन्हा अशी येते
प्रगती होऊन यशाचं शिखर
गाठलेलं असतं, , , , ,
तेव्हा लांबचे नातेवाईक
सुद्धा सांगतात हे आमचे
पाहुणे आहेत, , , , ,
*
हेच जीवन असतं संघर्ष
करत पुढे जायचं असतं
ठेवायचा असतो एक आदर्श
समाजासमोर कुणीच कमी नसतं
*
फक्त वेळ यावी लागते
न खचता करून दाखवायचं
एक ध्येय मनात ठेवायचं असतं
तुमचं यश तुमच्याच हातात असतं
*
समाजामागे धावायचं नसतं
समाज आपल्यामागे धावला पाहिजे
हेच मनात ठेवायचं असतं
स्वबळावर उभं राहायचं असतं
☆
© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈