श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ संत समागम… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
मला हो
सदगुरु भेटले.. |धृ|
जिकडे पहावे
तिकडे सदगुरु दिसे
ते पाठीराखा आहे
एवढे मज पुरेसे…
एक छोटीसी
निस्तेज चांदणी होतो
प्रकाशमान मी
तूझ्या तेजानी…
मुक्या प्राण्यात
चराचरात तूचि
विलक्षण हलचल हृदयी
सरसावतो सेवेसी…
आत्मा एकचि
विभिन्न योनी
विषण्ण मन
कधी मिळेल तया मनुष्य योनी…
संत संगतीने
जळतील पापे त्यांचे
मिळेल पुढील जन्म
मनुष्य योनीचे…
जन्मोजन्मी
लाभती तेची सदगुरु
कर्मानुसार मिळे योनी
साधने, सत्कर्मे भवसागर पार करू..
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈