सौ. अर्चना गादीकर निकारंगे
कवितेचा उत्सव
☆ द्विज… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆
☆
आज कसा काय माहीत तो एकटाच दिसत होता झाडावर ,
वेगवेगळे आवाज सतत काढून कसा कोण जाणे नव्हता जात दमून.
*
फार वेळ बसून प्रतिसाद नव्हता ;
म्हणून तो इकडून तिकडे उडत होता .
प्रतिसादाची अपेक्षा फोल ठरली ;
तरी ती मूर्ती निराश नाही झाली .
*
सकारात्मक होऊन साद घालत राहीला ,
एरव्ही दुर्वक्षित आज सर्वांच्या मनात राहीला ,
हळूहळू तो कौतुकास पात्र झाला ,
मग तो पक्षी खूप आनंदीत झाला .
*
रोज यावे ह्या समयी असे
नित्यनेमाने वागू लागला तसे ,
म्हणता म्हणता सवय बनली ,
त्याची व बघणार्याची ती दिनचर्या ठरली .
☆
© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈