सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ एक धागा रेशमाचा☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

(‘मनस्पर्शी साहित्य परिवार‘ यांच्यातर्फे आयोजित काव्यस्पर्धेत या कवितेला पुरस्कार दिला गेला आहे.)

एक धागा रेशमाचा 

सूत्र हे संवेदनांचे 

प्रेम विश्वास कर्तव्य 

नात्यातील बंधनांचे ||१||

*

भावा बहिणीची ओढ 

धागा हळव्या नात्याचा 

स्नेह जिव्हाळा अतूट 

बंध लोभस प्रेमाचा ||२||

*

सांगे बहीण भावाला 

वसे माहेर अंतरी

बंध मायेचे नाजूक

जपू दोघे उराउरी ||३||

*

नाही मागणे कशाचे 

तुला प्रेमाचे औक्षण 

लाभो औक्ष कीर्ति तुला 

मला मायेचे अंगण ||४||

*

जसा कृष्ण द्रौपदीसी 

पाठीराखा जन्मभरी 

नाते आपुले असावे 

सुखदुःख वाटेकरी ||५||

*

तुझ्या माझ्या भावनांना 

लाभे काळीज कोंदण 

नित्य जपून ठेवू या 

अनमोल असे क्षण ||६||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments