सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ द्रौपदीची कहाणी चालूच… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

(वृत्त : अनलज्वाला) 

माता भगिनी स्वतः रक्षण्या सिद्ध व्हा तुम्ही

मनगट अमुचे तुम्हास रक्षण्या सक्षम नाही 

*

जागोजागी कौरवांच्याच सभा भारती

पणास तुजला अजूनही ते इथे लावती 

*

असतील जरी भीष्म द्रोण हे येथेच हजर

जाणार काय तुझ्या कडे तर तयांची नजर 

*

दुर्योधन अन दुःशासन जर लाख असतील

एकटाच कृष्ण हा कुठे कुठे सांगा पुरेल 

*

आया बहिणी नाहीत तुम्हा का बरे नरांनो

शिस्त लावण्या पडलो उणेच का आयांनो 

*

विचार हा पण करा बरे हो या अंगाने

लयास गेले संस्कारांचे अव्वल लेणे 

*

घडवू शकली वीर पुत्र ही माय जिजाऊ

आदर्श तिचा आज तुम्हीही शकाल घेऊ 

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 3 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments