सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ जोगवा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
पदर पसरुनी मागते आई
जोगवा तू मजसी देई
भवानी कल्याणी रेणुका माई
जोगवा तू मजसी देई ।।
*
जीवन अवघे दुःखे भरले
माया मोह त्यास जडले
प्रयत्नानी जरी त्यागले
काम क्रोध मग जागे झाले
जाळ रीपू अन् कर पुण्याई
जोगवा तू मजसी देई
शिवानी जननी अंबाबाई
जोगवा तू मजसी देई ॥
*
क्षणोक्षणी या चिंता ग्रासती
तम व्यथेचे जग भासती
साहसाने सारे साहती
विपदा येती मागे पुढती
चिंता विपदा लयास नेई
जोगवा तू मजसी देई
स्वामिनी तारिणी वणीमाई
जोगवा तू मजसी देई ॥
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈