म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? कवितेचा उत्सव ?

गांधी काही भेटलेच नाहीत… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

मास्तरांनी सांगितले

जीवनामध्ये गांधी आणा

अहिंसा परमो धर्म

असे सातत्याने म्हणा

*

आजही जगामध्ये

आहेत म्हणे गांधीभक्त

ज्यांनी म्हणे सांडले नाही

कधी कोणाचेच रक्त

*

हाच घेऊन संदेश

चालू लागलो जीवनात

गांधी होते मनामध्ये

अन् प्रत्येक संघर्षात

*

एका गाली मार बसता

पुढे केला दुसरा गाल

हसत हसत समोरच्याने

केली माझीच लाल

*

सत्याग्रह अंगिकारला

अन्याय झाला जेव्हा

अजून वाट पाहतो आहे

न्याय मिळेल केव्हा

*

खिशातल्या गांधींसह

यश मिळविले काही

मास्तरांनी सांगितलेले

गांधी काही भेटलेच नाही

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments