श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
☆ र त न टा टा !☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
रत्ने अनमोल जन्मा येती
सटीसामाशी भारतात,
घर करुनी लोकां ह्रदयी
मग विलीन होती अनंतात !
*
तन मन धनाने अर्पिती
जनसेवेस आपले जीवन,
काढून देशोदेशी नवउद्योग
वाढविती भारताची शान !
*
नत मस्तक होऊन आपण
वाहू श्रद्धांजली महापुरुषाला,
आधुनिक उद्योग धंद्याचा
ज्याने भारतात पाया रचला !
*
टाटा नाममुद्रा उद्योगांवरची
ठरली जणू मुद्रा सचोटीची,
पाऊल ठेवून त्या पावलावर
पराकाष्ठा करूया प्रयत्नांची !
*
टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे
चाले संशोधन या रोगावर,
सतत करूनी रोग्यांची सेवा
नाव टाटांचे केले अजरामर !
☆
© प्रमोद वामन वर्तक
१०-१०-२०२४
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈