सुश्री त्रिशला शहा
कवितेचा उत्सव
☆ सालंकृत मराठी… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆
☆
काय सांगू सखे बाई
माझ्या मराठीची गोडी
ज्ञानेश्वर, तुकयानी
रचली अभंगवाणी
*
किती कविराजांनी
तिची गोडी चाखविली
साहित्यिकांनी किती लिहिली
कथा, चरित्र, कादंबरी
*
लोकसाहित्यातून जपला
महाराष्ट्राचा वारसा
भूपाळी ते भैरवीतून
सारा आसमंत निनादला
*
पोवाड्यातून उसळे रक्त
मराठ्यांच्या धमनीतून
शिवाजीचे आम्ही वंशज
मिरवितो स्वाभिमान
*
अशी आमची मायमराठी
साऱ्या जगात गाजते ही
काना, मात्रा, वेलांटीचे साज
लेऊन जशी झाली सालंकृत
☆
© सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈