सुश्री अपर्णा परांजपे

? कवितेचा उत्सव ?

☆ ✍️ कृतार्थ मी अन् कृतार्थ तूही…. ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

तो माझा अन् मी त्याची दुग्धशर्करा योगच हा 

मनी वसे ते स्वप्नी दिसे भगवंताचा खेळच हा…

*

“सोहम् सोहम्” शिकवून मजला धाडियले या जगतात 

“कोहम् कोहम्” म्हणोनी अडलो उगाच मायापाशात..

*
अंतर्चक्षू प्रदान करुनी रूप दाविले हृदयात 

कमलपत्र निर्लेप जसे नांदत असते तीर्थात..

*

सुखदुःखाची जाणीव हरली, ईश्वर चरणी भाव जसा

तसेच भेटे रुप तयाचे, गजेंद्राशी विष्णू तसा…

*
महाजन, साधूळ संत सज्जन काय वेगळे असे तिथे?

प्रेमाची पूर्तता व्हावी, हे ध्येय निश्चित तिथे…

*
“ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः”।

वचन तुझे रे अनुभव घ्यावा, हीच आस रे तुझी पहा…

*
निजानंदी रंगलो मी तव हृदयाशी भेटता 

आतच होता, आहे, असशी 

जाणीव याची तू देता…

*
कृतार्थ मी अन् कृतार्थ तूही 

जन्माचा या अर्थ खरा

आनंदाचा कंद खरा तू 

(मम)हृदयाचा आराम खरा…

*
कृष्ण सखा तू, रामसखा तू प्रेमाचा अवतार सख्या 

अयोनिसंभव बीज अंकुरे 

सात्विक, शुध्द हृदयी सख्या..

*
प्रशांत निद्रा प्रशांत जीवन देहात पावले मज नाथा

प्राणांवर अधिराज्य तुझे रे

केशव देतो (जसा)प्रिय पार्था…

*

आदिशक्ती अंबाबाई शक्तिरुपाने वसे इथे

त्याच शक्तीने जाणीव होते भगवंत असे जेथे…

☆ 

🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments