श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

सुखी माणसाचा सदरा !  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“मीच जगी सर्वात सुखी” 

मंत्र जपा सतत मनात,

ठेवा असं आपलं वागण 

सदा होई वाहवा जनांत !

*

हात सढळ तुमचा ठेवा

यथाशक्ती मदतीसाठी,

बना काठी आंधळ्याची

दिन दुबळ्या लोकांसाठी !

*

हाकून शेळ्या उंटावरूनी

उगा उपदेश करू नका,

जरी दिसला झगडा समोर 

तरी नाक खुपसू नका !

*

करून कर्तव्य गृहस्थाश्रमी 

भाजा भाकऱ्या लष्कराच्या,

चुकवू नका कधीच तुम्ही 

संधी कुठल्या लोकसेवेच्या !

*

मिळून मिसळून लोकांमध्ये 

सन्मार्गाने जीवन आचरा,

मग लोकं मागती मनापासूनी 

द्या तुमचा सुखी सदरा !

द्या तुमचा सुखी सदरा !

© प्रमोद वामन वर्तक

१२-१०-२०२४

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments